गुलाबी थंडी स्टेटस इन मराठी | Gulabi thandi status in Marathi | Gulabi Thandi quotes in Marathi.

गुलाबी थंडी स्टेटस इन मराठी / Gulabi thandi status in Marathi / Gulabi Thandi quotes in Marathi.

Gulabi-thandi-status-in-Marathi
Gulabi thandi status in Marathi

नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे.आपल्या नवीन पोस्ट Gulabi thandi status in Marathi,मध्ये.आपण आपल्या मित्र मैत्रिणी आई-वडील बहिण-भाऊ आणि इतर सर्व मित्र मैत्रिणींना तुम्ही शेअर करू शकता म्हणून या पोस्टमध्ये.Gulabi Thandi quotes in Marathi,Gulabi thandi status in Marathi,Gulabi Thandi SMS Marathi,Gulabi Thandi message Marathi,घेऊन आलो आहोत त्याच्या साह्याने तुम्ही तुमच्या WhatsApp Instagram,Facebook,SMS-message,पाठवू व शेअर करू शकता 🙏 धन्यवाद🙏


🙏💙🎅🎄☃️🌬️❄️☃️❄️🌬️☃️🎄🎅💙🙏

अंग चोरत शरीर नि

 तोंडातल्या गरम वाफा

पहाटवेड्या थंडीतही

 जसा फुलतो चाफा.....

🙏💙🎅🎄☃️🌬️❄️☃️❄️🌬️☃️🎄🎅💙🙏

अशी गुलाबी थंडी

घेउन आली गारवा

तशीच गुलाबी थंडी

जणू आळवला मारवा..

🙏💙🎅🎄☃️🌬️❄️☃️❄️🌬️☃️🎄🎅💙🙏

असेल ती अशीच रात

तुझी ग्रीष्माची मीठी

हरवून गुलाबी स्वप्नी

झेलीन अर्थ ओठी..

🙏💙🎅🎄☃️🌬️❄️☃️❄️🌬️☃️🎄🎅💙🙏

आज नाहीस तु, फक्त तुझेच भास 

गुलाबी थंडीत तुझ्या, आठवणींचा सहवास ---

🙏💙🎅🎄☃️🌬️❄️☃️❄️🌬️☃️🎄🎅💙🙏

आवाज नसतानाही वाजते 

तिला गुलाबी म्हटले कि लाजते,

घाबरली कि अंगात भरते 

भल्याभल्यांना गार करते...

🙏💙🎅🎄☃️🌬️❄️☃️❄️🌬️☃️🎄🎅💙🙏

एकटे होते रातीला

सोबती झाला वारा

स्पर्शात झेलून गारवा

छळतो मज शहारा..

🙏💙🎅🎄☃️🌬️❄️☃️❄️🌬️☃️🎄🎅💙🙏

कडाक्याच्या या थंडीत

अंग लागते शहारु

थोडयाश्या उबेच्या सहार्याने

तन मन लागते बहरु..

🙏💙🎅🎄☃️🌬️❄️☃️❄️🌬️☃️🎄🎅💙🙏

कळीचं फुलण हा तर तिचाच गुण 

वेड्या कवीसाठी मात्र ती प्रेमाची खुन

पाखराचे बोल कुणासाठी गाणे

कुणा येई धुंदी कुणी छेडि तराणे

कधी गुलाबी थंडी कधी वारा कुंद

कुणी शोधे राधा कुणा हवा मुकुंद..

🙏💙🎅🎄☃️🌬️❄️☃️❄️🌬️☃️🎄🎅💙🙏

कसे हरवले गुलाबी जादूत?

न कळेच माझे मला

प्रभातवेळी पहिल्या दवात

जरी भेटते रोज तुला

अशीच रहावी रात साजणा

गारवा अपुला पांघरुनी

गुलाबी थंडीत स्पर्शाच्या

ऊब 'ग्रीष्माची' घेउनी......

🙏💙🎅🎄☃️🌬️❄️☃️❄️🌬️☃️🎄🎅💙🙏

कुड्कुडना-या थंडीतली,

 उबदार तुझी मिठी 

उष्ण तुझे श्वास ,फुललेले

 माझ्यासाठी..

🙏💙🎅🎄☃️🌬️❄️☃️❄️🌬️☃️🎄🎅💙🙏

गुलाबी थंडी मज

वेड लावून जाते

'ग्रीष्माच्या' मिठीत तव

अंतरंगी शहारते....

🙏💙🎅🎄☃️🌬️❄️☃️❄️🌬️☃️🎄🎅💙🙏

गुलाबी पहाटेत शुभ्र कोवळे धुके

जणू सूर्यदेवही याच्या गारठ्यात सुके ...

🙏💙🎅🎄☃️🌬️❄️☃️❄️🌬️☃️🎄🎅💙🙏

गुलाबी मदहोशी हवेत

फुलुदे उष्ण श्वास

साजणा मज घ्या कवेत

संगमाचा हा मुग्ध ध्यास..

🙏💙🎅🎄☃️🌬️❄️☃️❄️🌬️☃️🎄🎅💙🙏

गुलाबी हि थंडी

मी नवा खेळ मांडी

ये मस्तीत सखे

उत्साह मनातून सांडी..

🙏💙🎅🎄☃️🌬️❄️☃️❄️🌬️☃️🎄🎅💙🙏

ज्याला न उपाय काही

त्याला थंडी सोसावी लागते !

थंडीचा आनंद द्विगुणीत करण्या

हक्काची शेकोटी असावी लागते..

🙏💙🎅🎄☃️🌬️❄️☃️❄️🌬️☃️🎄🎅💙🙏

तुझे मनमोहक हसणे

नेहमीच मला लाजवते

पहाटेच्या गुलाबी थंडीत

नयनी माझ्या स्पर्शुन जाते..

🙏💙🎅🎄☃️🌬️❄️☃️❄️🌬️☃️🎄🎅💙🙏

तुझ्या मिठीतील गोडवा

नेहमीच मला भावतो..

जसा थंडीच्या दिवसातील गारठा

क्षणार्धात निघुन जातो...

🙏💙🎅🎄☃️🌬️❄️☃️❄️🌬️☃️🎄🎅💙🙏

थंडी म्हणजे तुझ्या मिठीची उब

गुलाबी थंडीत तुझे गुलाबी रूप..

थंडीत उबदार भावनांचा कहर,

त्यात तुला माहेरी जाण्याची लहर...

🙏💙🎅🎄☃️🌬️❄️☃️❄️🌬️☃️🎄🎅💙🙏

थंडी म्हणजे दिवाळीची सुट्टी

खाऊ, स्वेटर आणि शेकुटी

थंडी म्हणजे वार्षिक सहल

मित्रांसोबत खूप धमाल...

🙏💙🎅🎄☃️🌬️❄️☃️❄️🌬️☃️🎄🎅💙🙏

थंडी वाढते...

शरीर माझे कुडकुडते....

तुझ्या मिठीच्या आठवणीने

गरमी या शरीराला जाणवते..

🙏💙🎅🎄☃️🌬️❄️☃️❄️🌬️☃️🎄🎅💙🙏

थंड्या हवेच्या झुळूकांचे शहारे अंगावर बागडले 

ज्यांना चालणे सांभाळून सांभाळून शिकवले

तेच आता माझ्याशी तेवर बदलून दूर चालले 

मस्त गुलाबी ऋतू सप्तरंगात न्हावून निघाले..

🙏💙🎅🎄☃️🌬️❄️☃️❄️🌬️☃️🎄🎅💙🙏

दाट पांघरलेले धुके, दवबिंदूची आसवे 

थंडीची प्रत्येक रात्र, मी जगतो तुझ्यासवे..

🙏💙🎅🎄☃️🌬️❄️☃️❄️🌬️☃️🎄🎅💙🙏

पहाटेची गुलाबी थंडी

मी मुक्त अनुभवतो,

त्यातून तुझा स्पर्श

मला आजही जाणवतो..

🙏💙🎅🎄☃️🌬️❄️☃️❄️🌬️☃️🎄🎅💙🙏

पहाटेची हूडहूड, वार्याची मंद गती... 

विझलेल्या शेकोट्या नि भिजलेली माती.. 

दवाचे मोती... धुक्याची चादर... 

चुलीची उब किंवा आईचा पदर.... 

हळूच उघडणारे किलकिले दार... 

हौशी पहिलवानांनी भरलेला पार... 

कौलातल्या झरोक्यातून येणारा 

उन्हाचा इवलासा कवडसा.. 

घरातल्या नव्या जोडप्याने 

शोधलेला आडोसा.. 

मध्येच येणार्‍या झुलुकेने

तिच्या सर्वांगावरचा शहारा... 

त्यातून वाचण्यासाठी 

त्याच्या मिठीचा पहारा... 

गुलाबी थंडीत सृष्टीचा न्यारा रंग

तेवढ्याच गुलाबी प्रेमात तेही दोघे दंग....

🙏💙🎅🎄☃️🌬️❄️☃️❄️🌬️☃️🎄🎅💙🙏

पुन्हा उदास रात्र, थंडीने लागते बहरू

लाजत धुके हळूच, लागते फेर धरू..

🙏💙🎅🎄☃️🌬️❄️☃️❄️🌬️☃️🎄🎅💙🙏

बघ सखे सुर्य अस्ताला चाललाय

कस गोंडस रुप दाखवतोय तो त्याचे

पडेल आता सभोवार गुलाबी थंडी

चालु होइल नित्यक्रमण आता स्वप्नांचे..

🙏💙🎅🎄☃️🌬️❄️☃️❄️🌬️☃️🎄🎅💙🙏

बर्फासारख्या थंडीमध्ये,

तुझ्या मिठीत लपावसं वाटत..

एका जन्माचं आयुष्य,

एका क्षणात जगावसं वाटत...

🙏💙🎅🎄☃️🌬️❄️☃️❄️🌬️☃️🎄🎅💙🙏

माझा रागातील ओलावा नेहमीच

तुला हवाहवासा का वाटतो

हिवाळयाच्या या कुडकुडणार्या थंडीत

कॊफीचा घोट प्यावासा का वाटतो..

🙏💙🎅🎄☃️🌬️❄️☃️❄️🌬️☃️🎄🎅💙🙏

या वेळची गुलाबी थंडी

थोडी वेगळीच आहे

मन सुखावणारा गारवा

मजा एक आगळीच आहे..

🙏💙🎅🎄☃️🌬️❄️☃️❄️🌬️☃️🎄🎅💙🙏

रक्त गोठवणारी थंडी , हातात हात तुझा 

घातलेली तु शपथ "तु राहशील फक्त माझा"

🙏💙🎅🎄☃️🌬️❄️☃️❄️🌬️☃️🎄🎅💙🙏

रात्रीच्या थंडीत बाईक वरुनी फिरणे

अजूनही मला आठवते...

तुझे मजला मिठी मारुनी बसणे...

चित्र माझ्या मनी ते अजूनही दाटते ..

🙏💙🎅🎄☃️🌬️❄️☃️❄️🌬️☃️🎄🎅💙🙏

श्वासात श्वास गुंफ़ता

अनामिक ओढ होते

जीवनाची रित सखे मन हे

गुलाबी थंडीचा आस्वाद घेते..

🙏💙🎅🎄☃️🌬️❄️☃️❄️🌬️☃️🎄🎅💙🙏

सकाळच्या या थंडीत

सुर्यसुद्धा उशिरा उगवतो

गारठ्याने या कुडकुडत

माझी मी रात्र जागवितो..

🙏💙🎅🎄☃️🌬️❄️☃️❄️🌬️☃️🎄🎅💙🙏

सांज हा गारवा

हि गुलाबी हवा

ओठांतून साद घाली 

हा प्रीतीचा पारवा..........

🙏💙🎅🎄☃️🌬️❄️☃️❄️🌬️☃️🎄🎅💙🙏

स्वरांची तार छेडता

शंख निनादतो कानी

पहाटेच्या गुलाबी थंडीतही

शहारे उठतात मनोमनी.

🙏💙🎅🎄☃️🌬️❄️☃️❄️🌬️☃️🎄🎅💙🙏

हातात घालूनी हात 

फिरू थोडे चांदण्यात 

शांत शीतल गारवा

प्रेमिकांना सुखवीत..

🙏💙🎅🎄☃️🌬️❄️☃️❄️🌬️☃️🎄🎅💙🙏

हातात हात गुंफून चालायचो

मस्त गुलाबी थंडीत बागडायचो 

उष्ण श्वासात हुंकार घ्यायचो 

गुलाबी थंडीच्या आठवणीत रमायचो..

🙏💙🎅🎄☃️🌬️❄️☃️❄️🌬️☃️🎄🎅💙🙏

हिवाळ्यातील ही गुलाबी हवा

सोबत तू ही असावी..

घट्ट मारलेल्या मिठीत

शिरण्यास थंडीसही जागा नसावी..

🙏💙🎅🎄☃️🌬️❄️☃️❄️🌬️☃️🎄🎅💙🙏

होतास ओठिचे दव पीत

शहारले तन तव मीठीत

ऊब देण्याचे धुंद गुपित

मंद धुक्यात रंगली प्रीत..

🙏💙🎅🎄☃️🌬️❄️☃️❄️🌬️☃️🎄🎅💙🙏

Final word:

मित्रांनो आजची आमची पोस्ट Gulabi thandi status marathi तुम्हाला कशी वाटली हे कंमेंट करून सांगायला विसरू नका.आणि पोस्ट आवडली असल्यास तुमच्या मित्र-मैत्रिणी बरोबर share करायला विसरू नका.

मित्रांनो आम्ही तुमच्यासाठी असेच चांगले चांगले स्टेटस घेऊन येणार आहोत असंच तुमचा सपोर्ट ठेवा.

धन्यवाद मित्रांनो

Post a Comment

0 Comments